आभासी तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती केलेला जगातील पहिला अधिकृत सिनेमा म्हणून ‘कार्ने वाय एरिना’ या चित्रपटाला विशेष ऑस्कर पुरस्कार घोषित करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऑस्कर पुरस्कार विजेते दिग्दर्शक अलेहांद्रो गोन्झालेझ यांनी केले असून त्यांच्यामुळे चित्रपटनिर्मिती तंत्रज्ञान आणखी एक पाऊल पुढे गेले आहे. सुपरस्टार दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान यानेही आता अलेहांद्रो गोन्झालेझ यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आपले पुढील चित्रपट आभासी तंत्रज्ञानाचा वापर करून बनवायचा निर्णय घेतला आहे. परंतु सध्या तो आपल्या ‘बॅटमॅन द डार्क नाइट’, ‘इनसेप्शन’, ‘इंटरस्टेलर’ या काही आपल्या जुन्या चित्रपटांना अल्ट्रा एचडी या तंत्राने रूपांतरित करण्यात व्यग्र आहे. अल्फ्रेड हिचकॉकला आदर्श मानणाऱ्या ख्रिस्तोफरचा अॅनिमेशन, स्पेशल इफेक्ट आणि कॅमेरा ट्रिक्स यावर फार विश्वास आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews